Breaking News

पुन्हा लढायला तयार राहा - मराठा क्रांती मोर्चा

फलटण - येथे मराठा क्रांती मोर्चा बैठकीला उपस्थित समन्वयक(छाया - यशवंत खलाटे पाटील)

Be ready to fight again - Maratha Kranti Morcha

फलटण मध्ये झाली बैठक,लवकरच साताऱ्यात ठरणार पुढील दिशा

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी  शिंदे फडणवीस सरकारने पावले उचलावीत, तसेच आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून संपूर्ण महाराष्ट्रात नव्या जोमाने समाज एकवटावा, यासाठी मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याने सुरुवात करावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गदर्शक यांनी फलटण येथे बैठक आयोजित केली होती, त्या मध्ये आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घ्यायचेच आणि तेही ओबीसीमधूनच असा नारा देत पुनः एकदा हरिओम म्हणत सुरुवात करायची असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.      

     मराठा क्रांती मोर्चाची फलटण तालुक्यातील सर्व मराठा समाजातील असलेले समन्वयक यांची बैठक जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक विवेक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील प्रमुख समन्वयक उपस्थित होते, यावेळी सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले, व त्या नंतर पुणे, सातारा जिल्ह्यातील प्रमुख मार्गदर्शक यांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या 28 जानेवारी ला अकरा तालुक्यातील सर्व समन्वयक व मार्गदर्शक यांची बैठक घेण्यात येणार असून त्या मध्ये सर्वानुमते पुढील दिशा ठरविण्यात येणार असून येणाऱ्या काळात मराठा समाज पुन्हा एकवटून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन, आपली ताकद दाखवावी लागेल,व जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन व जे येणार नाहीत त्यांना सोडून, हा लढा पुढे न्यायचा असल्याने आता मतभेद बाजूला सारून न्यायालयीन लढ्याबरोबरच रस्त्यावरील लढ्याला सज्ज राहण्याची तयारी दर्शविली आहे.यावेळी फलटण तालुक्यातील सर्व समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.

No comments