महाराजा मल्टीस्टेटला सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - येथील महाराजा मल्टीस्टेटला राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ,पुणे. च्या वतीने दिला जाणारा मानाचा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण ना. सुरेशजी प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार व अध्यक्ष सहकार संवर्धन समिती नवी दिल्ली, विजयकुमार साहेब केंद्रीय निबंधक सहकार मंत्रालय नवी दिल्ली, खासदार हेमंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, सतीश मराठे माजी संचालक बँक ऑफ इंडिया , अनिल कवडे सरकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, काकासाहेब कोयते अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई, राधेश्यामजी चांडक अध्यक्ष बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा, उदयजी जोशी राष्ट्रीय महामंत्री सहकार भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी येथे सहकार गौरव सोहळ्यामध्ये वितरण होणार आहे. महाराजा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा मल्टीस्टेटची घोडदौड सुरू असून या संस्थेच्या सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही संस्था कार्यरत असून या संस्थेच्या एकूण आठ शाखा सध्या कार्यरत आहेत. या संस्थेची वार्षिक उलाढाल 513 कोटीच्या पुढे असून या संस्थेस आतापर्यंत नॅशनल अवॉर्ड 2017, नॅशनल अवॉर्ड 2018, सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार 2018 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप जगताप यांनी दिली.
No comments