नाईकबोमवाडी एमआयडीसीचे भुमीपुजन मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार ; सोमंथळीच्या विकासाला निधी कमी पडुन देणार नाही - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - तालुक्यांमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत आहे. तालुक्यांमध्ये रस्ते, रेल्वे, पालखी मार्ग, फलटण बारामती रस्ता यासाठी निधी आणून कामे मार्गी लावत आहे. युवकांच्या हाताला काम देणेसाठी लवकरच नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीचे भुमीपुजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करून, यापुढे गावांतील जनतेने सदैव भाजपाचे पाठीशी राहावे असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
सोमंथळी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत, थोड्या मतांचे फरकाने पराभूत झालेले सरपंच पदाचे उमेदवार महादेव आलगुडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी निर्णय घेऊन, गावाचे विकासासाठी गावातील तरुण व जेष्ठ नागरिक, माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, हणमंतराव मोहिते, संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड नरसिंह निकम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर , पुर्व भागाचे नेते विशाल माने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, या गावाने चांगला निर्णय घेतला, आज सत्तर टक्के गावाने भाजप मध्य प्रवेश केला आहे, त्यामुळे मी गावाचे विकासासाठी निधी कमी पडुन देणार नाही अशी ग्वाही खा.रणजितसिंह यांनी दिली.
सत्तेसाठी गावातील सगळे पुढारी एकत्र आले, जे कधी एकमेकांची तोंडे सुद्धा बघत नव्हती. सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी कधी काळी भांडणे केली. ते सर्व एकत्र आले. ही निवडणूक धनशक्ती विरूद्ध जनशक्तीची झाली. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादागिरी, धमक्या देऊन लोकांना पैशाचे अमिष दाखवुन, सत्ता घेतली, परंतू जनता आता त्यांच्या पाठीशी राहणार नाही, या तालुक्यांमध्ये गावा गावांमध्ये दोन गट करुन भांडण लावुन, सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडु नये असे आवाहन खा. रणजितसिंह यांनी केले.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले यांनी मार्गदर्शन केले. गावातील ज्येष्ठ नागरिक रामहरी भापकर, मजाबा पोकळे, हरिभाऊ बोडरे माजी चेअरमन, बलभीम सोडमिसे, अशोक यादव, शिवाजी सोडमिसे, राजेंद्र गोफणे, आप्पा भापकर , दत्तु यादव, दशरथ करचे, पोपट करचे,बलभीम सोडमिसे,सुरेश जराड, हिटलर आलगुडे, भिवा पोकळे, अजीनाथ करचे , विठ्ठल पोकळे,बाळासो यादव, धनंजय जाधव अनेक मान्यवर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
No comments