जाधववाडी, फलटण येथील रस्त्याच्या वाहतुकीत बदल
फलटण : फलटण शहराज लगत मौजे जाधववाडी येथील ओढ्यावरील लहान पूल व पोहच रस्ता बांधकाम 16 जानेवारी ते 15 मे 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक रिध्दी-सिद्धी अपार्टमेंट - महादेव मळा-डी.एड.चौक फलटण तसेच बाह्यवळण कॉटेज हॉस्पिटल - झिरपवाडी - कोळकी - पृथ्वी चौक फलटण अशी वळविण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे फलटण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता यांनी कळविले आहे.
No comments