Breaking News

निंभोरे येथे शासकीय कामात अडथळा; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Disruption of government work at Nimbhore; A case has been registered against three

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ - आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत सुरू असलेल्या  धर्मपुरी ते लोणंद या  कामात निंभोरे ता. फलटण येथे शासकीय अधिकारी यांची कॉलर धरून, शिवीगाळ करून, हात-पाय तोडण्याची धमकी दिली. व जेसीबी वाहनास आडवे उभे राहुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी फलटण तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी,  आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग क्रमांक ९६५ चे काम सध्या सुरू आहे. धर्मपुरी ते लोणंद या  कामात निंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीत, दि. ६/१/२०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, दत्तात्रय दिगंबर साळुंखे, भूसंपादन समन्वय अधिकारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या शर्टची कॉलर शाबुद्दीन बाबूलाल शेख रा. सुरवडी ता. फलटण याने  धरली, तसेच रमजान बाबुलाल शेख रा. सुरवडी ता. फलटण व दस्तगीर अल्लाबक्ष पठाण रा. निंभोरे ता.फलटण यांनी दत्तात्रय साळुंखे यांना शिवीगाळ केली व तुम्ही येथे काम करायचे नाही,  तुम्ही येथे काम केले तर हात पाय तोडीन अशी धमकी दिली व तिघांनी मिळून तेथे काम करत असलेल्या जेसीबी वाहनास आडवे उभे राहुन शासकीय कामात अडथळा आणला असल्याची फिर्याद  दत्तात्रय दिगंबर साळुंखे यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे या करीत आहेत.

No comments