फलटणमध्ये पीओपीच्या गोडावूनला आग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 21 : - शिवाजीनगर, फलटण येथील प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गोडावून मध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना वेल्डींगची ठिणगी उडुन लागलेल्या आगीत, लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्या शेजारी असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची धावपळ उडाली होती. या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फलटण शहरातील रिंग रोडला लागून असलेल्या शिवाजीनगर येथे एका मोकळ्या जागेत घरातील पीओपी करण्यासाठी लागणाऱ्या पुट्टी व त्याचे इतर साहित्य ठेवलेल्या गोदामात वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यावेळी त्या ठिकाणी वेल्डींगची ठिणगी उडाली व ते कोणाच्याच लक्षात आले नाही, मात्र काही वेळाने तिथे आगीने रौद्ररूप धारण केले व एकच खळबळ उडाली. या आगीमुळे शेजारी असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्यात मोठी भीती निर्माण होऊन, आग लागली आणि पळापळ सुरु झाली. त्यानंतर मात्र लगेचच फलटण नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब आगीवर नियंत्रण मिळवले . या आगीमुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे समजते.
दरम्यान या ठिकाणी असलेल्या साहित्याची अक्षरशः राख झाली असून लागलेली आग व शेजारी असलेले रुग्णालय व रुग्णांची झालेली धावपळ ही काळजाचा ठोका चुकवणारी होती.वेळीच आविवर नियंत्रण मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला अशी चर्चा घटनास्थळी चालू होती.
No comments