मुंगूस घरी पाळले ; वनविभागाकडून गुन्हा दाखल
वनविभागाने ताब्यात घेतलेली मुंगस |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ : दोन मुंगुस घरी ठेवल्याप्रकरणी वनविभागाच्यावतीने फलटण शहरातील पाचबत्ती चौक परीसरातील एकजणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्लम अब्दुलरेहेमान पटेल याने आपल्या घरी २ मुंगसे पाळली असल्याची माहिती वननविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दि. १७ जानेवारीस पाचबत्ती चौक, फलटण येथे जावून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली असता मिळालेली माहिती खरी असल्याचे दिसुन आल्याने, वनविभागाने पटेल याच्यावर वन्यप्राणी अवैधरित्या घरी ठेवल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करुन सदर मुंगसे जप्त केली.
सदर कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण यांनी व वनक्षेत्र कर्मचारी यांनी केली.
No comments