मुधोजी हायस्कूलच्या मुलींच्या हॉकी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
यशस्वी हॉकी खेळाडू सोबत माननीय श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, प्राचार्य श्री गंगवणे बी.एम, उपप्राचार्य श्री ननवरे ए वाय, पर्यवेक्षक श्री काळे सर, श्री महादेव माने, श्री खुरंगेबी.बी, व श्री सचिन धुमाळ |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - सांगली येथे झालेल्या विभाग स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशालेचे प्राचार्य गंगवणे बी. एम, उपप्राचार्य श्री ननवरे ए वाय. हे उपस्थित होते.
मुधोजी हायस्कूल ने हॉकी या खेळाची उज्वल परंपरा राखत सांगली येथे झालेल्या विभाग स्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा ५-० गोल ने पराभव करून सामन्याच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या नूल या संघाचा १-० गोल ने पराभव करून सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यांमध्ये सांगली मनपा संघाचा ५-० गोल ने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये फॉरवर्ड लाईन मध्ये कु. सिद्धी केंजळे, कु.निकिता वेताळ, कु. प्रणिता राऊत, कु. श्रुतिका घाडगे, कु. श्रद्धा यादव, व वेदिका वाघमारे यांनी गोल नोंदवले . हाफ लाईन मध्ये कु.शिफा मुलानी, कु. श्रेया चव्हाण, कु. तेजस्विनी कर्वे, बचाव फळीमध्ये मानसी पवार, अनुष्का सपाटे व अनुष्का केंजळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. गोलकीपर म्हणून अनुष्का चव्हाण तिने देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गोल आडवले. या संघाची कर्णधार म्हणून अनुष्का केंजळे ने काम पाहिले. याच संघाने बेळगाव येथे झालेल्या निमंत्रित हॉकी स्पर्धेमध्ये देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपविजेतेपद पटकावले. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री खुरंगे बी.बी, हॉकी मार्गदर्शक श्री धुमाळ सचिन, व धनश्री क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मा.सभापती महाराष्ट्र राज्य विधान परिषद, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम.उपप्राचार्य , श्री ननवरे ए वाय , जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री फडतरे सर ,पर्यवेक्षक श्री काळे सर शिक्षक या सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले.
No comments