क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त फलटण येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
सातारा 2 : क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 दुपारी 4.30 वाजता प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था, फलटण येथे सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्यावतीने स्वर संगीत शास्त्रीय व उपशास्त्रीय या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात किरण शिंदे यांचे सनई वादन व गायन आणि अरुण शिंदे यांची तबला साथ गायिका अपर्णा बिवलकर यांचे गायन, होणार आहे व निवेदक, निरूपक सागर धुमाळ, किरण शिंदे करणार आहेत, तसेच सहगायक, वादक कलाकार , विवेक शिंदे, योगेश साळुंके ,संतोष साळुंके, श्रद्धा शिंदे, सागर जाधव, विजय साळुंके, झुंबर जाधव, सुजाता शिंदे, हरिदास साळुंखे, ओमकार साळुंखे, अक्षर साळुंखे, सुनील प्रजापति, श्रावणी पवार नृत्य समीक्षा सोनवलकर , रिया पवार यांचे सादरीकरण होणार आहे. श्रोत्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
No comments