Breaking News

पोकलेन मशीन साहित्य चोरी व इंजिनमध्ये साखर ; चालक व हेल्पर च्या विरोधात गुन्हा

Poklen machine material theft ; Crime against driver and helper

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ जानेवारी - सुरवडी येथे पोकलेन मशीनचे  लिव्हर मशीन, स्विच बॉक्स, २४ व्हॉल्ट बॅटऱ्या व २०० लिटर डिझेल असा एकूण ७८ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले तसेच पोकलेन इंजिन मध्ये साखर टाकून नुकसान केल्याप्रकरणी  पोकलेन मशीनच्या चालक व हेल्परच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरवडी ता. फलटण येथे दि. १५/१/२०२३ रोजी  रात्रौ १०.०० ते दि १६/१/२०२३ रोजी  ९.०० वाजण्याच्या दरम्यान, संतोष अंकुश कारंडे यांचे पोकलेन मशीन कमिन्स कंपनीजवळ उभे होते.  पोकलेन मशीन नं ई एक्स२१०-४११४९  वरील दोन्ही लिव्हर मशीन , स्विच बॉक्स,  २४ व्हॉल्ट बॅटऱ्या व २०० लिटर डिझेल असे एकूण ७८ हजार रुपये किंमतीचे साहित्य चालक बर्गेश कुमार रामचंद्र रा. उत्तरप्रदेश व त्याचा हेल्पर छोटू असे दोघांनी चोरून  नेले आहे. तसेच मशिनच्या इंजिनला डिझेल व पाणी सप्लाय करणाऱ्या पाईपा तोडून व इंजिनमध्ये साखर टाकून पाईपाचे व इंजिनचे नुकसान केले असल्याची फिर्याद पोकलेन मशीन चे मालक संतोष अंकुश कारंडे यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार यादव करीत आहेत.

No comments