फलटण येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृती ; मान्यवरांकडून अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - आज १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे २०५ वा शौर्य दिन साजरा होत असताना, फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने, भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारली होती. आज शौर्य दिनानिमित्त विविध मान्यवरांनी व विविध संघटना, पदाधिकारी व नागरिकांनी येथे अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृतीस सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यांनतर पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, दादासाहेब चोरमले, ॲड. नरसिंह निकम, भाजपाचे अशोकराव जाधव, अमोल सस्ते, वसीमभाई मणेर, मेहबूबभाई मेटकरी, तुकाराम गायकवाड, काँग्रेसचे अमिरभाई शेख विविध पक्ष पदाधिकारी, संघटना व नागरिकांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती.
No comments