वाखरी येथे दुचाकी व रोख रक्कमेची चोरी ; दोघांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : वाखरी ता.फलटण गावच्या हद्दीतून टीव्हीएस कंपनीची जुपिटर स्कूटी ( क्र. एमएच ११ सी एक्स ७४७६) दुचाकी गाडी व रोख रक्कम चोरून नेल्याप्राकरणी दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.वसंत फुला भील (मूळ रा.जांभोरे ता.धरणगाव जि.जळगाव),सुरेश विश्वास सोनवणे (मूळ रा.बिलखेडा ता.धरणगाव जि.जळगाव) सध्या दोघे रा.वाखरी ता.फलटण जि.सातारा अशी संशियतांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद किरण प्रकाश कारंडे (वय ३३,रा.वाखरी ता.फलटण जि. सातारा ) यांनी दिली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादीचे शेतात काम करीत असलेले मुकादम व ऊसतोड कामगार यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय संशियतांनी ४० हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची जुपिटर स्कूटी दुचाकी गाडी ( क्र. एमएच ११ सी एक्स ७४७६) व रोख २०,००० रूपये चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार राऊत करत आहेत.
No comments