Breaking News

ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीस धडक ; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Two-wheeler collision with sugarcane transport tractor; Death of a biker

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ : फलटण सातारा रस्त्यावर मिरगाव ता. फलटण गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरुन ट्रॅक्टर चालकाने पलायन केले असुन ट्रॅक्टर चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

        अमोल हनुमंत गायकवाड रा. आदर्की खु. ता. फलटण असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. २० डिसेंबर २०२२ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मिरगावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने दुचाकी क्र. एमएच ५० डीजे ३४०७ ला भरधाव वेगात धडक दिल्याने दुचाकीस्वार अमोल गायकवाड याचा मृत्यू झाला. सदर अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. सदर अपघाताची नोंद १६ जानेवारी २०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत ट्रॅक्टर चालक अशोक दत्तात्रय जाधव वय ३१ रा. 22 फाटा खंडाज ता. बारामती याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सदर अपघाताची फिर्याद पोलिस नाईक राजकुमार देवकर यांनी दिली असुन तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहेत.

No comments