Breaking News

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची भीमस्फूर्ती भूमी मंगळवार पेठ येथे भेट

Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra's visit to Bhimshorti Bhoomi Mangalwar Peth

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री  अजयकुमार मिश्रा यांनी मंगळवार पेठ, फलटण येथे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३९ साली फलटणला ज्या ठिकाणी आले होते, त्या भीमस्फूर्ती भूमी (शेरी)  येथील स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी मंगळवार पेठेच्या वतीने ना. अजयकुमार मिश्रा यांना शाहू-फुले-आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

    भारतीय जनता पार्टीच्या मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात मंत्री महोदयांनी अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची संवाद साधला, प्रशासकीय कार्यालयांना भेट दिली.   विविध मंदिरांना, स्थळांना भेट दिली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  याप्रसंगी त्यांच्यासमवेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी आमदार बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे हे होते. 

     दि. ६ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भीमस्फूर्ती भूमी,  मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी मंगळवार पेठेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ना. अजयकुमार मिश्रा यांना शाहू-फुले-आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. स्मारकाची पाहणी केल्यानंतर ना. अजयकुमार मिश्रा व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी मंगळवार पेठ येथे जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी माजी आमदार बाळा भेगडे, माजी नगरसेवक दत्ता अहिवळे, बी.टी. जगताप, विजय येवले, जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, विश्वास भोसले, प्रशांत कोरेगावकर, अमोल सस्ते उपस्थित होते.

No comments