Breaking News

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा ‘भीमस्फूर्ती भूमी’ मंगळवार पेठ येथील स्मारकास भेट देणार

Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra will visit the memorial at 'Bhimshonti Bhoomi' Mangalvar Peth

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ५ डिसेंबर  : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे सध्या फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी २ वाजता मंत्री महोदय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३९ साली फलटणला ज्या ठिकाणी आले होते, त्या भीमस्फूर्ती भूमी (शेरी) मंगळवार पेठ येथील स्मारकाला भेट देणार आहेत. 

    भारतीय जनता पार्टीच्या मिशन २०२४ ची सुरवात नुकतीच करण्यात आली असून ही मोहीम आता फलटणमध्ये सुद्धा आली असून यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्याकडे फलटणची जबाबदारी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य प्रवास संयोजक माजी आमदार बाळा भेगडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन कलयाणशेटटी, सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. 

       भाजप वरिष्ठ नेते व केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा हे आज दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता निंभोरे येथे राष्ट्रीय महामार्ग कामाच्या गुणवत्तेची पाहणी करणार आहेत. सकाळी ९.१५ वाजता मलठण येथील श्री सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिरात उपस्थित राहुन दर्शन घेणार आहेत. सकाळी १०.३० वाजता फलटण येथील प्रशासकीय कार्यालयांना भेट देणार आहेत व सातारा जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. यांनतर सकाळी ११.४५ वाजता रिंगरोड येथील जनऔषधी केंद्राला भेट देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थी यांच्याशी महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ०२.१५ वाजता मंगळवार पेठ येथे सचिन अहिवळे यांच्या निवासस्थानी सामाजिक दुर्बल घटकातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी ३ वाजता फरांदवाडी येथे जल जीवन मिशनचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,  त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

No comments