Breaking News

पत्नीस जबरदस्तीने परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले ; पतीसह ६ जणांवर बलात्कार व छळ केल्याचा गुन्हा

The wife was forced to have physical intercourse ; Crime of raping and torturing 6 persons including husband

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ डिसेंबर - पैसे परत देता येत नसल्यामुळे, पतीने  आपल्या पत्नीस जबरदस्तीने परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, व नंतर त्याच्या विरोधात पत्नीस  पोलिसात तक्रार देण्यास सांगितले, परंतु पत्नीने तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केल्याप्रकरणी १) हणमंत लोखंडे  २) पती प्रविण बाळासो जाधव  ३) सासरे बाळासो सोमा जाधव,  ४) सासू सौ.मालन बाळासो जाधव  सर्व रा.जाधववस्ती, ढवळ ता. फलटण जिल्हा सातारा  ५) रूपाली सोमनाथ करे, ६) सोमनाथ गुलाब करे रा.मुरूम ता.फलटण जि.सातारा यांच्या विरोधात बलात्कार, विवाहितेचा छळ व मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी, पीडित विवाहितेस तिच्या पतीने काही कारण नसताना काठीने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पतीचे अफेअर बाबत नणंद रूपाली हिस सांगीतले असता, तिने माझ्या भावाने १० जणी ठेऊ देत, तुला काय करायचे आहे, असे म्हणून, सासु, सासरे , पती, नणंद, नंदावा यांनी हाताने मारहाण केली. त्यानंतर  घर बांधकामासाठी पतीने त्यांचे मित्र हणमंत लोखंडे व इतर अनोळखी लोक यांचेकडून हात उसणे पैसे घेतले होते. ते लोक पैसे मागण्यासाठी घरी येऊ लागले, पत्नीने, लोक घरी येत असल्याचे पतीस सांगितल्यावर,  मी  लोखंडे यांच्याकडून पैसे घेतले आहेत. परंतु मी त्याला पैसे देऊ शकत नाही, असे पतीने सांगितले.  काही दिवसांनी पती घरी असताना लोखंडे हा पैसे मागणीसाठी घरी आला. पतीने आपल्या पत्नीस लोखंडे बरोबर बोलायला लावले.  त्यानंतर पतीने पत्नीला सांगितले की, मी हणमंत लोखंडे याचे पैसे देऊ शकत नाही, पण त्यावर मी एक उपाय शोधला आहे.

    त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये व डिसेंबर २०२२ मध्ये एक वेळा मौजे जाधववस्ती, ढवळ ता. फलटण येथे राहते घरी हणमंत लोखंडे हा पैसे मागण्यासाठी आला. त्यावेळी पती याने, आपल्या पत्नीस हणमंत लोखंडे याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून, स्वतः घराच्या बाहेर निघून जात होता.  पत्नीने याबाबत पतीकडे विचारणा केली असता, हे असेच चालू दे, असे  म्हणून पत्नीस हाताने मारहाण केली.  त्यानंतर काही दिवसांनी हणमंत लोखंडे हा पतीकडे परत पैसे मागू लागला, त्यामुळे दिनांक १३/१२/२०२२   रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास,  घरच्यांनी, तु हनुमंत लोखंडे यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दे, असे सांगितले. परंतु पत्नीने त्यास नकार दिला असता, पती यांनी मारहाण करून डोक्यात दगड मारून दुखापत केली असल्याची फिर्याद पीडित विवाहितेने बारामती तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन, तो फलटण ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.  अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.

No comments