मुजवंडी येथे महिलेचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - मुंजवडी ता. फलटण येथे पीडित महिला घरासमोर असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत असताना, पीडितेला खाली पाडून, तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, तिला जातीवाचक शिवीगाळ करून, पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गणेश उर्फ दाद्या मच्छिंद्र चव्हाण रा. मुंजवडी याच्या विरोधात विनयभंग व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंजवडी ता. फलटण गावच्या हद्दीत, दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सांयकाळी ७.३० वाजता पीडित महिला आपल्या घरासमोर असलेल्या चुलीवर स्वयंपाक करत असताना, गणेश उर्फ दाद्या मच्छिंद्र चव्हाण रा. मुंजवडी ता. फलटण याने पीडितेचा गाऊन धरून, तिला खाली पाडले व हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, तुला सोडतच नाही असे म्हणून, जातीवाचक शिवीगाळ करून, दमदाटी केली व पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, त्यावेळी पीडितेने आरडाओरडा केला, म्हणून चव्हाण तिथून पळून गेला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. त्याअनुषंगाने संशयित गणेश उर्फ दाद्या चव्हाण यांच्या विरुद्ध आयपीसी व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
No comments