Breaking News

ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून शिंदेनगर येथील दांपत्याची १० लाख रुपयांची फसवणूक

10 lakh fraud in Shindenagar for supplying sugarcane workers

    फलटण (गंधवता वृत्तसेवा) दि.११ -  सन २०२२-२३ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस तोडणी कामगार पुरवतो म्हणून शिंदेनगर ता.फलटण येथील दाम्पत्याकडून वेगवेगळे ५ लाख रुपये, असे एकूण १० लाख रुपये घेऊन, ऊसतोड कामगार न पुरवता शिंदेनगर ता. फलटण येथील दांपत्याची फसवणूक  केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील एका विरोधात फसवणुकीचे वेगवेगळे दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी बापूराव जगन्नाथ रणवरे  रा. शिंदेनगर ता. फलटण  यांनी  सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड उपळवे ता. फलटण येथे ऊस तोडणी कामगार पुरवण्यासाठी,  कुशा गर्जा पटले रा. आगरीपाडा ता.धडगाव जि. नंदुरबार  याच्यासोबत करार करून त्याला, शिंदेनगर ता.फलटण येथे दि. ६/६/२०२२ रोजी ५ लाख रुपये दिले होते. परंतु कुशा पटले याने ऊसतोड कामगार न पुरवता व दिलेले ५ लाख रुपये परत न  करता बापूराव  रणवरे यांची फसवणूक केल्याची फिर्याद बापूराव जगन्नाथ रणवरे यांनी दिली आहे. 

    तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सौ. चित्रा बापूराव रणवरे  रा. शिंदेनगर ता. फलटण  यांनी  सन २०२२ - २०२३ या गळीत हंगामासाठी, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड उपळवे ता. फलटण येथे ऊस तोडणी कामगार पुरवण्यासाठी,  कुशा गर्जा पटले रा. आगरीपाडा ता.धडगाव जि. नंदुरबार  याच्यासोबत करार करून त्याला, शिंदेनगर ता.फलटण येथे दि. ६/६/२०२२ रोजी ५ लाख रुपये दिले होते. परंतु कुशा पटले याने ऊसतोड कामगार न पुरवता व दिलेले ५ लाख रुपये परत न  करता सौ. चित्रा  रणवरे यांची फसवणूक केल्याची फिर्याद सौ. चित्रा बापूराव जगन्नाथ रणवरे यांनी दिली आहे.  अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.

No comments