खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नातून फलटण तालुक्यातील विविध कामाकरीता 5 कोटी मंजूर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ -फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या सन 2022-23 ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या नधीतून विविध विकास कामाकरीता 5 कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील व तालुक्यातील येणाऱ्या प्रमुख रस्ते खराब झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, यावर तात्पुरती दुरूस्ती करण्यात येत होती. परंतु पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्वीसारखी होत होती. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी, मतदारसंघाचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या आणि याबाबत 2022-23 ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या निधीतून फलटण तालुक्यातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.
यामध्ये उपळवे (सावंतवाडी) ता. फलटण जि.सातारा येथे व्यायामशाळा (क्रीडा संकुलन) बांधणे. 1 कोटी, कांबळेश्वर ता. फलटण जि.सातारा येथे कांबळेश्वर ते कवडीचा मळा रस्ता करणे. 15 लक्ष, कांबळेश्वर ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे. 10 लक्ष, कुरवली बु. ता. फलटण जि.सातारा येथे निंबाळकर बंगला (बाणगंगा धारणा जवळून) ते दालवडी रस्ता करणे. 70 लक्ष, झडकबाईचीवाडी ता. फलटण जि.सातारा येथे शिंदेमाळ ते तरडफ ग्रा. मा २२६ रस्ता कॉक्रीटीकरण करणे. 10 लक्ष, तांबवे ता.फलटण जि.सातारा येथे मोहन शिंदे ते संतोष शिंदे घर रस्ता कॉक्रीटीकरण करणे. 10 लक्ष, दर्याचीवाडी ता. फलटण जि. सातारा येथे कुमकाले वस्ती ते दर्याचीवाडी गाव रस्ता सिमेंट काँक्रीट करणे 10 लक्ष, धुमाळवाडी ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. 10 लक्ष, पिंपळवाडी ता. फलटण जि. सातारा येथे गणेश मंदिर ते विठ्ठल मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, 10 लक्ष, भाडळी खु. ता. फलटण जि. सातारा येथे डूबल वस्ती ते तिरक्वाडी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. 15 लक्ष, मानेवाडी ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रीट करणे. 15 लक्ष, राजाळे ता. फलटण जि. सातारा येथे गावठाण ते २६ चारी पर्यंत रस्ता करणे. 10 लक्ष, राजाळे ता. फलटण जि. सातारा येथे २६ फाटा ते ठेंगील वस्ती रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे, 10 लक्ष, राजाळे ता. फलटण जि. सातारा येथे स्मशानभूमी बांधणे, 5 लक्ष, वाखरी ता. फलटण जि. सातारा येथे स्मशानभूमी बैठक व्यवस्था विधी कट्टा रोड बांधणे. 10 लक्ष, विचुर्णी ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे, 10 लक्ष, विडणी ता. फलटण जि. सातारा येथे दंडिले मळा ते राउत वाडी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे. 15 लक्ष, विडणी ता. फलटण जि.सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे, 10 लक्ष, शेरेचीवाडी (हि) ता. फलटण जि. सातारा येथे प्रभाकर चव्हाण ते बबन गोप्णार घर सिमेंट काँक्रीट करणे. 5 लक्ष, शेरेचीवाडी (हि) ता. फलटण जि.सातारा येथे शामराव जाधव से महालक्ष्मी मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, 5 लक्ष, शेरेचीवाडी (हि) ता. फलटण जि. सातारा येथे शिंदेवस्ती ते चांभारवाडी रस्ता सिमेंट कॉक्रीट करणे, 10 लक्ष, सस्तेवाडी ता. फलटण जि. सातारा येथे अरुण चव्हाण घर ते सस्तेवाडी हायस्कूल सिमेंट काँक्रीट करणे. 10 लक्ष, साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे बाजार पेठ रस्ते करणे 15 लक्ष, सालपे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे 10 लक्ष, सावंत वाडा तालुका फलटण जिल्हा सातारा येथे वाघजाई मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे 10 लक्ष, सुरवडी ता. फलटण जि.सातारा येथे अंतर्गत बंदिस्त गटारे तयार करणे. 20 लक्ष, सुरवडी ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे 20 लक्ष, सोनवडी बु. ता. फलटण जि. सातारा येथे स्मशानभूमी नवीन बांधणे. 10 लक्ष, फरांदवाडी ता. फलटण जि. सातारा येथे पराग पीवसी फक्टरी ते नांदल रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, 10 लक्ष, फरांदवाडी ता. फलटण जि.सातारा येथे वडजल फरांदवासी शिव रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, 10 लक्ष, मठाचीवाडी ता. फलटण जि.सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट करणे. 10 लक्ष, गुणवरे ता. फलटण जि. सातारा येथे अंतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रीट करणे, 10 लक्ष, असे एकूण रक्कम 5 कोटी ची मंजूरी मिळाली आहे.
No comments