निरा देवघर व कृष्णा - भीमा स्थिरीकरणाची हवाई पाहणी करावी ; केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांकडे खासदार रणजितसिंह यांची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन, निरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरणाची हवाई पाहणी करावी व प्रकल्पांना निधी द्यावा अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
दिल्ली येथे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली व नुकतीच महाराष्ट्र सरकारने निरा देवघर या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन, निधीची तरतूद केलेली आहे व प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. केंद्र सरकारने निरा देवघर प्रकल्पासाठी निधी द्यावा व प्रत्यक्ष या प्रकल्पाची हवाई पाहणी करावी, जेणेकरून या दुष्काळी भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपणार आहे. तसेच महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाचा असणारा कृष्णा - भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प कृष्णा लवादाच्या अंतर्गत काही तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला आहे. यावरही केंद्रीय मंत्री यांनी मार्ग काढावा. हवाई पाहणी करून पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळून हा संपूर्ण परिसर ओलिताखाली येईल अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
No comments