Breaking News

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे सांस्कृतिक आनंदोत्सव साजरा

Cultural festival celebrated at Progressive Convent School and Junior College Gunaware

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरे , येथे दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी वार्षिक सांस्कृतिक आनंदोत्सव "लक्ष्य २०२३" मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नर्सरी ते इ.सातवी मधील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवत वाहवा मिळवली. तर सहावी व सातवी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'गड आला पण सिंह गेला' या प्रसंगाचे सादरीकरण केले. हा प्रसंग कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू ठरला. विद्यार्थ्यांनी हा प्रसंग हुबेहुब सादर केला. मावळ्यांची स्वराज्याविषयी असलेली निष्ठा बघून पालक भारावून गेले. 

    सांस्कृतिक आनंदोत्सव 'लक्ष्य २०२३' कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर   पंचायत समिती सदस्य संजय कापसे,  ​​महात्मा शिक्षण संस्था, फलटणचे अध्यक्ष दादासाहेब चोरमले, काळभैरवनाथ विद्यालय गुरसाळेचे सभापती संजय पाटील, प्रेमवारी फिल्म प्रॉडक्शन धनगरवाडा वेबसिरीस टीम, पांडुरंग पवार,सौ. सुलोचना पवार, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव. विशाल पवार सर,  सरस्वती शिक्षण संस्था संचालिका तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रियांका पवार मॅडम, प्रशालेचे पर्यवेक्षक किरण भोसले सर, समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम उपस्थित होते.  

    सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत करून  सरस्वती प्रतिमेचे पूजन व अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  श्री.विशाल पवार सर(सचिव,सरस्वती शिक्षण संस्था ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून, या बालकांचे कौतुक केले.  

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शाळेतील समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ आणि शिक्षिका निकिता मुळीक यांनी केले.  या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली. अशा प्रकारे सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरे , या ठिकाणी वार्षिक सांस्कृतिक आनंदोत्सव "लक्ष्य २०२३"  मोठ्या उत्साहात व आनंदाने संपन्न झाला.

No comments