कार्यकुशल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
स्वराज इंडिया उद्योगाचे शिल्पकार व कै. सुलोचनादेवी (आजी) यांचा सामाजिक वसा आणि (नेते) वडील माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या समाजसेवेचा वारसा जपणारे, स्वप्न सत्यात उतरवणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व, कार्यसम्राट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांचा आज १९ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा होत आहे. रणजितसिंह दादांचे कार्यकर्तृत्व पाहुनच अनेकांनी त्यांना माढा लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त करून, तसे वातावरणही निर्माण केले होते. जनतेच्या इच्छेला मान देवुन दादांनी माढा लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी वाढदिवसाच्या शुभमुहर्तावर होकार दिला आणि माढा लोकसभा मतदार संघातुन प्रचंड मताधिक्याने निवडुन येत प्रस्थापितांना धुळ चारली. कारण भाजपामधून 'तिकीट' मिळवून सर्वाधिक मतांनी निवडुन येत प्रस्थापितांना त्यांनी पाणी पाजले आणि माजी खासदार शरदराव पवार यांच्या नावाने ओळखला जाणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचा भगवा फडकविला.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी निवडुन आल्यानंतर अवघ्या ४० दिवसात फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण तर केलेच परंतु प्रत्यक्ष फलटण-लोणंद - पुणे रेल्वे सेवाही ११ सप्टेंबर २०१९ ला सुरू केली. निरा देवघर प्रकल्पाचे विनापरवाना राहिलेले पाणी निरा डाव्या कालव्याद्वारे बारामतीला दिले जात होते. त्याचा पाठपुरावा करीत खासदार रणजितसिंह यांनी ते पाणी निरा उजवा कालव्यामध्ये प्रत्यक्ष आणून आनंदोत्सव साजरा केला होता. त्याच बरोबर खासदार झाल्यापासून मतदार संघातील प्रलंबित कामे करण्याचा धडाका सुरु केला.
मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदार संघातून न्यावी अशी मागणी खा. रणजितसिंह यांनी पंतप्रधानांकडे केलेली होती. त्यानुसार प्रकल्प अहवालात बारामती, अकलूजसह ११ स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या प्रकल्पाला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणार आहे. मुबंई व हैद्राबाद हे अंतर फलटण मधून थोडया कालावधीत कापता येणार आहे. त्याचबरोबर फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग, फलटण - बारामती रेल्वे मार्ग यासाठीही प्रयत्न करून २०२३ च्या बजेटमध्ये १२० कोटी रुपये निधीची तरतूद केली.
निरा देवघर धरणाचे उर्वरित काम त्वरित मार्गी लागण्यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानुसार निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली. फलटण ते पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत.
निरा देवघर सिंचन प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हवाई पाहणी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी निरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची हवाई पाहणी केली. नीरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली आहे. यानिमित्ताने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
फलटण शहर हे राष्ट्रीय महामार्गाद्वारे विकसीत करण्याचा खासदार रणजितसिंह यांचा प्रयत्न आहे. फलटण येथे विमानतळ आणि येथून हवाई वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच फलटणला हवाई मार्गाने जगाशी जोडण्याच्या दिशेने खासदार रणजितसिंह यांची वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागणी केलेल्या, फलटण शहरातील ८ किलोमीटरचा पालखी मार्ग मंजूर करण्याबरोबरच फलटण तालुक्यात दोन ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग ओव्हर ब्रिज, नाईकबोमवाडी येथे एमआयडीसीसाठी जोडरस्ता तयार करावा, दहिवडी रस्त्याचे महामार्गाच्या रूपांतर करावे, फलटणचा रिंग रोड पूर्ण करावा व फलटण विमानतळावर हवाई पट्टी करावी या सर्व मागण्या केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर ठिकठिकाणी वारकरी संप्रदायासाठी निवासस्थान, स्वच्छतागृहांची सोय होणार आहे.
फलटण तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून ओळख असताना. आई-वडिलांच्या प्रेरणेने स्वतःच्या कल्पक बुध्दीमत्तेने दादांनी खऱ्या अर्थाने तालुक्याचा चेहरामोहराच बदलला आहे. स्वराज प्रकल्प निंभोरे सारख्या ग्रामीण भागात सुरू करून दादांनी पहिले धाडसाचे पाऊल टाकुन बेरोजगारांच्या हाताला काम देवून उद्योगाचा श्रीगणेश केला. त्यावेळी समाजातून अनेक अवहेलना, उपेक्षा पदरी आल्या असताना दादांनी केवळ तात्पुरता विचार न करता दुरदृष्टीचा ध्यास ठेवून स्वराज उद्योग सुरू केला. दादांनी अनेक अडचणींना तोंड देवून प्रकल्प सुरू केला. दादांच्या स्वभावात 'तडजोड' नसल्याने जे काम हाती घेतले ते तडीस नेण्यातच खरे यश असते या उक्तीप्रमाणे त्यांनी अथक प्रयत्नातून दुध संकलन गोळा केले. दुधाचे कलेक्शन, दुधाचा दर्जा, योग्य बाजारभाव पारदर्शक कारभार, चुकीच्या गोष्टींना वाव न देता सचोटीने पाच हजार लिटर पासून सुरू केलेला व्यवसाय लाखाच्यापुढे रोजचे दुधाचे संकलन नेले.
फलटणचा ग्रामीण भाग म्हणजे दुष्काळी पावसाचा लहरीपणा बारमाही पाण्याचे दुर्भिक्ष प्रादेशीक नळपाणी पुरवठा योजना बंद पशुधनाची होरपळ, बळीराजाचा जीव कासावीस झालेला असताना दादांना परिस्थिती शांत बसु देईना. ढवळ, ताथवडा, खडकी, मलवडी, वेळोशी, मानेवाडी, ताथवडा, उपळवे, दऱ्याचीवाडी, मांडवखडक, सावंतवाडी, दालवडी, तरडफ इत्यादी वाड्या वस्त्यावर पाणी टंचाई, चारा नसल्याने पशुधन सांभाळणे अवघड झाले असताना. दादांनी महाराष्ट्रातील छावण्यांचा अभ्यास केला. सरकारच्या आदेशाची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच छावणी सुरू करू, या विचारातून दादांनी डवळ येथे पशुधन वाचवण्यासाठी छावणी सुरू केली. छावणीतील नियोजन, चारा, पाणी, सावली यातुन , दादांनी मुक्या जित्राबांची (जनावरांची) पुण्याई पदरी घेतली. प्रादेशीक नळ पाणी पुरवठा योजना अनेक कारणांनी बंद अवस्थेत असताना दादांनी स्वत: पाणी पुरवठा योजना सुरू केल्या. प्रसंगी स्वराज उद्योगाची यंत्र सामुग्री वापरुन शेतकरी राजाला हात देण्याचे काम करूनदादांनी माणूसकीचा ठसा उमटविला.
स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून दादांनी सर्वसामान्यांना बचतीचे महत्त्व पटवुन, अडीअडचणीला माफक दरात कर्ज देवून संसार फुलविले. सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविला एकमेकाला साह्य करू अवघे धरू सुपंथ या नावाने बचत कर्ज वितरण, नैसर्गिक अपत्ती साहय्य, गरीब, निराधार यांना मदत करून दादांनी जनसेवेचे व्रत हाती घेवून सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा चंग बांधला.
मलटण मध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतीक वारसा जपण्याचा दादांचा प्रयत्न वाखानण्यासारखा आहे. मंडळाच्या माध्यमातून गरीब, अनाथ, गरजू, निराधार यांना वह्या, पुस्तके, परीक्षा फी सवलत प्रसंगी, अन्न-धान्य, आजारी रुग्णांना मोफत औषधोपचार, आर्थिक मदत करून गणेशोत्सवाचे माध्यम लोकोपयोगी कामासाठी करणारे दादा म्हणजे मलटण वासीयांचे 5 आधारस्तंभच आहेत.
गिरवी जि.प.गटातून सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना मताधिक्याने निवडून आणण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. प्रस्थापितांना जबरदस्त धक्का देवुन दादांनी विजय मिळवला. राजकारणापेक्षा समाजकरणावरच जास्त भर असल्यांने मतदार संघातील पाणी पुरवठा योजना, छावणी, रस्त्यांची अंतर्गत कामे, बेरोजगारांच्या हाताला कामे देवून दादांनी राजकारणी व्यक्तींच्या डोळ्यात अंजन घातले आहे. फलटण नगरपालिकेत सतांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपळवे येथे साखर कारखाना उभारुन तरुणांना रोजगार निर्मिती तर केलीच परंतु बळीराजाला दिलासा देण्याचे काम देखील केलेले आहे.
फलटण तालुक्यामध्ये यापूर्वी साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर देत नव्हते, मात्र लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्यामुळे तालुक्यातील साखर कारखान्यामध्ये स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेत पहिली बाजी लोकनेते हिंदुराव कारखान्याने मारली. फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी तालुक्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना सर्वात जास्त दर या गळीत हंगामामध्ये देणार असल्याची ग्वाही स्वराज उद्योग सर्वेसर्वा रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी दिली होती. त्याप्रमाणे दरवर्षी तालुक्यातील इतर कारखान्यांच्या अगोदर उसाचा पहिला हप्ता शासकीय धोरणानुसार जाहिर करुन तो शेतकन्यांच्या खात्यात जमा करुन दादांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे.
No comments