Breaking News

मराठा क्रांती मोर्चा : फलटण तालुक्यात १५ गावात शाखांचे उद्घाटन

Maratha Kranti Morcha: Opening of branches in 15 villages in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - मराठा क्रांती मोर्चाच्या गाव तिथे शाखा व राजकारण विरहित एकजूट या संकल्पणेतून मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा रविवार दि.१९ फेब्रुवारी होत असून, तब्बल पंधरा गावात या शाखेचे उद्घाटन होणार आहे. सर्व समन्वयक व मार्गदर्शक व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    मराठा क्रांती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात निघत असताना तालुका पातळीवर सर्वात मोठा मोर्चा फलटण तालुक्यात निघाला त्या मध्ये फलटण मध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून एकजूट दाखविली होती,त्याची दखल घेत मराठा खडा तो सबसे बडा हे दाखविले,दरम्यान त्या नंतर कोरोना मुळे काहीशी मरगळ समाजामध्ये आली होती, ती मरगळ झटकुन पुन्हा एकदा हाक देत "एक मराठा लाख मराठा"देऊन सर्वांनी एकत्र येऊया अशी हाक व साथ दिली त्या अनुषंगाने गाव तिथे राजकारण विरहित "मराठा क्रांती मोर्चा"शाखा स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली त्या मुळे सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासू व आपल्या मराठा बांधवाला साथ देऊ असे ठरले,त्यासाठी मुख्य समन्वयकांनी गावागावात जाऊन राजकारण विरहित मराठा म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले व सर्वांनी त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला आहे.

    दरम्यान आता पहिल्या पंधरा शाखांचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी रविवार दि.19 फेब्रुवारी त्याचे उद्घाटन त्या त्या गावातील युवती व महिलांच्या हस्ते केले जाणार असून त्यासाठी मुख्य समन्वयक सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना फलटण येथे अभिवादन करतील व त्या नंतर झडकबाईचीवाडी,ताथवडा,पिराचीवाडी, मिरेवाडी,वाघोशी,वडगावं,कोऱ्हाळे,वडजल,काशीदवाडी,ढवळेवाडी,निंभोरे,संगमनगर(नादल),मुळीकवाडी,बिबी,घाडगेवाडी या पंधरा गावात उद्घाटन होणार असून सर्व समन्वयक,मार्गदर्शक व समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटण ने आवाहन केले आहे.

No comments