जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
सातारा : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांच्यासह दोन्ही कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी भाषेचे महत्व व आजच्या दिनाचे महत्व याचे प्रतिपादन केले.
No comments