खासदार रणजितसिंह यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करावा - जयकुमार शिंदे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा १९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा होत आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी व तालुक्यातील जनता मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करत असतात, परंतु यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा असल्याकारणाने, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्याबरोबर कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी व जनतेने शुभेच्छा देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी येऊ नये. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येत आहे की, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून आपण साजरा करावा. त्यामध्ये फळ वाटप , रक्तदान शिबिर, गावाची, मंदिराची स्वच्छता असेल अशा विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा करावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले आहे.
No comments