Breaking News

नीरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळणार ; केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केली हवाई पहाणी; खा. रणजितसिंह यांच्या पाठपुराव्यास यश

पत्रकार परिषदेत बोलताना गजेंद्रसिंह शेखावत त्यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शहाजीबापू पाटील, आ. समाधान अवताडे, मा. आ. प्रशांत परिचारक

Neera Deoghar Project and Krishna Bhima Stabilization Scheme will be accelerated;  Union Minister Shekhawat made an aerial inspection;  MP  Success in pursuit of Ranjitsinh Niak Nimbalkar

  पंढरपूर (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ फेब्रुवारी -  नीरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल.  महाविकासआघाडीच्या काळात राज्यातील सर्व प्रकल्प रखडले गेले असून, सत्ता बदलानंतर आता या रखडलेल्या प्रकल्पांना गती येईल. नीरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत मी राज्यसरकारशी पत्रव्यवहार केलेला आहे.  या दोन्ही प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी निरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची हवाई पाहणी केल्यानंतर पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत  दिली. यानिमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी नीरा देवघर प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

 पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

 केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे आपण आज निरा - देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची हवाई पाहणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले दोन्हीही प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल आहे, ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर करून, लवकरात लवकर दोन्हीही प्रकल्प पूर्णत्वास जातील. त्यासंदर्भात माझे राज्यसरकारशी पत्रव्यवहार झालेला आहे. राज्यसरकारही अनुकूल आहे. त्यामुळे निरा - देवघर व कृष्णा - भीमा स्थिरीकरण या दोन्ही प्रकल्पांना गती मिळेल.

   राज्यामध्ये असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण या प्रकल्पासह इतर  प्रकल्प राजकीय हेतूमुळे रखडवून ठेवण्यात आले होते. निरा - देवघर धरणातील पाणी बारामतीला वळवण्यासाठी पूर्वीच्या सरकारने बरेच प्रयत्न केले होते. परंतु आता राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने निरा - देवधर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता  देऊन रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत, असेही यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण या दोन्ही प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली व केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केलेल्या पाहणी दौरा व केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही प्रकल्पांना गती प्राप्त होईल, असा विश्वास खासदार निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments