Breaking News

फलटण - पंढरपूर व फलटण - बारामतीसाठी १२० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Provision of Rs 120 Crore Fund for Phaltan-Pandharpur and Phaltan-Baramati - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - महाराष्ट्र सरकारने फलटण ते पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर,  खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण - बारामती जे रेल्वेचे काम सुरू आहे त्यासाठी रेल्वे लाईन टाकण्यासाठी व फलटण - पंढरपूर रेल्वेसाठी   बजेटमध्ये   तरतूद करावी अशी मागणी केली, त्याची दखल घेऊन आज  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये १२० कोटी रुपयांची तरतूद केली. 

    केंद्र सरकारने फलटण - बारामती रेल्वेसाठी ० कोटी रुपयांची तरतूद   फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करण्याबाबत सुरुवातीची तरतूद म्हणून २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सूचित केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच फलटण पंढरपूर साठी लागणारा संपूर्ण निधी देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. जेणेकरून फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होऊन, देशातील व महाराष्ट्रातील तमाम वारकरी व जनतेसाठी ही सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे फलटणकर व पंढरपूरच्या जनतेने पाहिलेले स्वप्न लवकरच काहीच  पूर्ण झालेले दिसेल. 

     लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेपेक्षा जास्त कामे माढा मतदारसंघात होताना दिसत आहेत. यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले आहेत, याबाबत माढा लोकसभा मतदारसंघातील जनता खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे आभारी राहणार आहे. यामुळे फलटण- पंढरपूर, फलटण - बारामती, फलटण - लोणंद लवकरच औद्योगिकीकरणाच स्वप्नही आपल्याला पूर्ण झालेले दिसेल.   खूप मोठी आर्थिक चालना या भागाला मिळणार आहे, त्यामुळे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा केंद्रीय अध्यक्ष  जेपी नड्डा, वित्तमंत्र निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे आभार मानले आहेत.

No comments