Breaking News

बीएसएनएलच्या उद्यमी पथदर्शी प्रकल्पाचा ग्रामीण भागाला फायदा

भारत संचार निगम त्रि सदस्य समिती समवेत ग्रामस्थ
Rural areas benefit from BSNL's entrepreneurial pilot project

    फलटण (गंधवता वृत्तसेवा)  - भारत सरकार वरिष्ठ अधिकारी समितीने भारत संचार निगम लि., (BSNL) मार्फत उद्यमी या पथदर्शी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा आढावा घेण्यात आला. 

    तांबवे व निरगुडी ता. फलटण या  ग्रामपंचायतींना दूरसंचार विभाग भारत सरकार दिल्ली शुभेंदु गुप्ता, भारत संचार निगम पुणेचे वरिष्ठ अधिकारी विनय जांभळी, संचालक ग्रामीण (LSA) युवराज वर्मा यांचा समावेश असलेल्या त्री सदस्य समितीने भेट दिली. यावेळी भारत संचार निगम उप महाप्रबंधक सातारा व्ही. एम. पाटील, सहाय्यक महाप्रबंधक सातारा रियाज पटवेकर आणि दोन्ही गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी नागरिक उपस्थित होते. 

     सहाय्यक महाप्रबंधक रियाज पटवेकर यांनी उद्यमी या पथदर्शी योजनेची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. ग्रामीण भागामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा अनुदानीत कीमती मध्ये उपलब्ध असल्याचे सांगून प्रत्येक ग्राहकाला भारत सरकार ३ हजार रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत देत आहे. आपल्या गावी राहुन वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक तरुणांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे रियाज पटवेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

         या योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होत असून शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा या माध्यमातून ग्रामस्थ, शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना घरबसल्या घेता येत असल्याचे सांगत भारत संचार निगम लि. देत असलेल्या सेवेबद्दल सरपंच व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत भारत संचार निगमला धन्यवाद दिले. 

No comments