राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी फलटण येथील सचिन संपतराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांनी सचिन मोरे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करित निवडीचे पत्र दिले. लोणंद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित राज्याच्या पत्रकार संघाच्या बैठकीत मोरे यांची निवड केली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळभोर, कार्याध्यक्ष सचिन सूंबे, खंडाळा तालुका अध्यक्ष मोहन बोरकर, आबा धायगुडे,मंगेश माने, विजय शेळके, बोलकीस्ट शेख मॅडम, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, मुकुंदराज काकडे, अमोल काकडे,बापू दोरके, यांच्यासह अन्य राज्य स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन मोरे फलटण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात गेली १९ वर्ष कार्यरत असून त्यांच्या मालकीच्या धैर्य टाईम्स वृत्तपत्र, चॅनेल, व वेबपोर्टल चालवीत आहेत. पत्रकारितेमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर सदरची निवड करण्यात आली आहे.
सचिन मोरे यांच्या निवडीचे वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments