Breaking News

खा. रणजितसिंह यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती पासून अनेकांच्या शुभेच्छा!

खा. रणजितसिंह यांना शुभेच्छा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  शेजारी ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर
To MP Ranjit Singh Naik Nimbalkar on his birthday greetings from dignitaries! 
फलटण फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : वाढदिवसा निमित खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीश धनकड, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंदिर सेल अध्यक्ष कैरनेल सिंग या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
खा. रणजितसिंह यांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. धनंजय महाडिक, आ. राहुल कुल
     केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. धनंजय महाडिक, आ. राहुल कुल, यांच्या सह अनेकांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार घालुन पेढे भरवून कोल्हापूर येथे शुभेच्छा दिल्या आणि खा. रणजितसिंह यांना लाभलेले उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख समाधान सतत वाढत राहो असे साकडे महालक्ष्मी कडे घातले. 
        खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची भेट होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करताना कार्यकर्त्यांनी हा दिवस सेवा दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते.
        त्यानुसार फलटण शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गावागावात रक्तदान शिबीर, मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर, वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप, मिठाई वाटप त्याच बरोबर गावाची व गावातील सार्वजनिक ठिकाणांची, शाळा, मंदिरे, व्यायाम शाळा यांची स्वच्छ्ता करण्याचे उपक्रम राबविण्यात आले.
    दरम्यान फलटण सह संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी मोबाईल, सोशल मीडिया द्वारे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
    प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांनी शिवजयंती आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत वैद्यकिय तपासणी व उपचार शिबीरात सुमारे ७०० नागरिकांनी सहभागी होऊन वैद्यकिय तपासणी करुन घेतली आहे.

No comments