फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापक पदी वासंती जगदाळे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राज्य परिवहन (एस.टी.) फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापक पदी वासंती जगदाळे यांची मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. वासंती जगदाळे मॅडम यांनी फलटण आगारचा कार्यभार स्विकारला आहे.
मुळच्या नवेखेड(ईस्लामपुर)च्या रहिवासी असलेल्या जगदाळे यांनी सन २०१० मधे स्थानक प्रमुख म्हणुन देवरुख आगारातुन एस.टी.च्या सेवेस सुरुवात केली.नंतर त्यांनी सांगली,पलुस,तासगाव,ईस्लामपुर आगारात स्थानक प्रमुख म्हणुन ऊत्तम कामगीरी केली.
नुकत्याच झालेल्या आगार व्यवस्थापक बढती परिक्षेत त्यांनी ऊज्वल यश संपादन केल्याने, त्यांची फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापक पदी निवड करण्यात आली. आत्तापर्यतचा वाहतुक शाखेचा प्रदीर्घ अनुभव असल्याने बसेसच्या ऊपलब्धते नुसार प्रवाशांच्या मागणी नुसार लांब पल्यांच्या बसेस सुरु करणार असल्याचे जगदाळे मॅडम यांनी सांगीतले. फलटण आगारातील सर्व कर्मचारी-अधिकारी याचां असलेला योग्य समन्वय आणखीन वृध्दीगत करुन फलटण तालुक्यातील प्रवाशी-विद्यार्थी-ज्येष्ट नागरीक यानां वक्तशीर,जलद व सुरक्षित सेवा देण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहील असे जगदाळे यांनी सांगीतले. नुतन आगार व्यवस्थापक याचां कष्टकरी जनसंघ फलटण आगार तसेच कामगार संघटनेच्या व प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
No comments