३४ जनावरांची वाहतूक ; तिघांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - सोमंथळी ता. फलटण गावचे हद्दीत महिंद्रा पिकप मध्ये ३४ जर्सी गाईंचे वासरे भरून, त्यांना कत्तल करणेस घेऊन जात असताना वाहतूक करत असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत, याप्रकरणी बारामती तालुक्यातील तिघांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दि. २/३/२०२३ रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास सोमंथळी ता. फलटण गावचे हद्दीत, अलीम बाबूलाल शेख, अकबर मकबूल शेख दोन्ही रा. फलटण रोड गवार फाटा, ता. बारामती दादाभाई शेख राहणार ३९ फाटा ता. बारामती यांच्या मालकीचे चार चाकी महिंद्रा पिकप नंबर एम एच ४२ एम ४०४६ यामध्ये ३४ जर्सी गाईंचे वासरे भरून चालवली होती. त्यांना चारा पाणी याची कोणत्याही प्रकारची सोय न करता, कमी जागेमध्ये निर्दयीपणे तसेच त्यातील काही जनावरांचे पाय बांधून कत्तल करणेस घेऊन जात असताना मिळून आल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित हे करीत आहेत.
No comments