खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नातून फलटणला ५८ ट्रान्सफॉर्मर ; कर्मचाऱ्यांनी केला खासदारांचा सत्कार
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करतांना महावितरणचे कर्मचारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण विभागातून मागील पाच वर्षात एकूण ३५६ ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले होते, चोरीला गेलेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मागील पाच वर्षात २८७ ट्रान्सफॉर्मर आले होते, मात्र १०० केव्ही चे ५८ ट्रान्सफॉर्मर कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा जळालेले ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम प्रलंबित होते. ही बाब संबंधित अधिकाऱ्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितली. खासदार रणजीतसिंह यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्याने ऊर्जा विभागाने एकाच दिवसात ते ट्रान्सफॉर्मर दिले. ट्रान्सफॉर्मर फलटण मध्ये दाखल झाले असून अधिकारी व शेतकऱ्यांनी खासदार रणजितसिंह यांच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी खासदार रंजितसिंहाकडे तक्रारी केल्या होत्या की ट्रान्सफॉर्मर दिले जात नाहीत,मग उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत ऊर्जा विभागाला सदर ५८ ट्रान्सफॉर्मर मागणी खासदारांनी केली, ऊर्जा मंत्रालयातील आयुक्त,संचालक यांनी त्वरित सदर मागणीची पूर्तता करून फलटण विभागाला तात्काळ ५८ ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले, असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले, व खासदार रणजितसिंह यांनी मागणी करताच हे ट्रान्सफॉर्मर मिळाल्याने, फलटण तालुक्यातुन समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नुकतीच केंद्रीय ऊर्जा विभागाच्या कमिटी मध्ये निवड झाली असून, खासदार रणजितसिंह यांनी महावितरणला ट्रान्सफॉर्मर व इतर सामग्री उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सर्व वायरमन लोकांनी सत्कार करून आभार मानले. यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अभिजित नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे,अशोकराव जाधव,व इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व वायरमन उपस्थित होते.
No comments