हँडलला अडकवलेल्या पिशवीने केला घात ; पती ठार - पत्नी जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - पिंप्रद ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण पंढरपूर रोडवर मोटर सायकलच्या हँडलला साहित्याची पिशवी धोकादायक रित्या अडकवून, भरधाव वेगात मोटरसायकल चालवल्याने, साहित्याची पिशवीमुळे झालेल्या अपघातामध्ये चालक नानासो बनकर यांचा मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेली पत्नी जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मौजे पिंप्रद ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण ते पंढरपूर जाणारे रोडवर, व्यसनमुक्त युवा संघ महाराष्ट्र च्या कमानी जवळ दि. ११/२/२०२३ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल चालक नानासो बबनकर वय ५) वर्ष रा. सोमंथळी ता. फलटण यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल नंबर एम एच ११ सिटी ५३३४ च्या हँडलला उजव्या बाजूस साहित्याने भरलेली पिशवी, धोकादायकरीत्या अडकवून, मोटरसायकल निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवल्याने, पिशवी हँडलला अडकल्याने हँडलला एका बाजूस ओढला गेला व अपघात झाला. त्यामध्ये चालक स्वतःचे गंभीर दुखापतीस व मृत्यूस व त्याचे पाठीमागे बसलेले त्याची पत्नी जयश्री नाना कर्चे हिचे किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला आहे.
No comments