दिपंकर कांबळे व श्रेयस कांबळे यांची नॅशनल आर्बिटर चेस म्हणून नियुक्ती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - जाधववाडी, फलटण येथील नामांकित बुद्धिबळ खेळाडू दीपंकर कांबळे व श्रेयस कांबळे या दोघांनी बुद्धिबळाचे राष्ट्रीय पातळीचे पंच होण्यासाठी असणाऱ्या परीक्षेत यश संपादन केल्यामुळे त्यांची नॅशनल आर्बिटर म्हणून निवड करण्यात आली आहे.
डीप माईंड चेस अकॅडमी चे संस्थापक व आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू श्री.दिपंकर कांबळे त्याचबरोबर डीप माईंड चेस अकॅडमी चे दुसरे कोच प्रा.श्रेयस कांबळे या दोघांची सिनियर नॅशनल आर्बिटर (राष्ट्रीय पातळीचे पंच) म्हणून नियुक्ती झाली आहे. अत्यंत क्लिष्ट परीक्षेत दोघेही चांगल्या गुणांनी यशस्वीरीत्या परीक्षा पास झाले. फलटण तालुक्याच्या ठिकाणी आर्बिटरची उणीव या दोघा तरुण चेस खेळाडूंमुळे भरून निघणार आहे. या यशाबद्दल दोघांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments