Breaking News

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक ; ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Arrest of the accused in the crime of burglary; 3 lakh 20 thousand seized

    फलटण (गंधर्वता वृत्तसेवा) दि.६ - अडसूळ नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीच्या आधारे करत फलटण शहर पोलिसांनी घरफोडीसारखा गुन्हा उघडकीस आणला आहे. यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून तीन लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहितीनुसार, फलटण शहर पोलीस स्टेशन गुरनं-१५३/२०२३ भादंवि कलम ३८०, ४५७,४११,३४ हा गुन्हा दिनांक- १०/०२/२०२३ रोजीचे दाखल झालेला होता. सदरचे गुन्हातील फिर्यादी यांचे आडसुळ नर्सिंग होम या हॉस्पीटल मधील खोलीत लावलेल्या युपीएस च्या ६ बॅटऱ्या हॉस्पीटलच्या पाठीमागील गेटचे, व युपीएस ठेवलेल्या खोलीचे कुलुप हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कापुन, फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने हॉस्पीटलचे रुममध्ये प्रवेश करुन, रुममध्ये ठेवलेल्या ६०,०००/- रुपये किमतीच्या युपीएसच्या लिव्हफास्ट कंपनीच्या २३४२ टीटी, २०००एएच च्या ६ बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दिनांक ०९/०२/२०२३ ते दिनांक- १०/०२/२०२३ रोजीच्या रात्री चोरुन नेलेबाबत फिर्यादी यांनी दिनांक १०/०२/२०२३ रोजी तक्रार दिलेली होती.

    सदरची तक्रार दाखल होताच मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा, श्री. समीर शेख साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक साो सातारा, बापुसाहेब बांगर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तानाजी बरडे साहेब, मा. पोलीस निरीक्षक श्री. दादासाहेब पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सपोनि श्री. नितीन केनेकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस हवालदार फरांदे बनं १२९३, पोलीस नाईक सचिन जगताप बनं ५९४, पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब कर्णे बनं २७०१, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे बनं ८८६ यांनी गुन्हाचे घटनास्थळी भेट देउन, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीच्या आधारे, सदरचे गुन्हाचा अंत्यंत उत्कृष्ट रित्या तपास करून, सदरचा घरफोडीसारखा गुन्हा उघड करून, गुन्हामध्ये प्रत्यक्ष सहभाग असणा-या आरोपी नामे (१) सौ. सविता संतोष जाधव वय ३५ वर्षे (२) सौ. अलका युवराज घाडगे वय ४० वर्षे दोन्ही रा. कुंभारटेक मलटण ता. फलटण (३) सौ. सुगंधा शिवाजी जाधव वय ४० वर्षे (४) वनिता चंद्रकांत घाडगे वय ४७ वर्षे दोन्ही रा. स्वामी समर्थ मंदीराजवळ, मलटण, फलटण जि.सातारा (५) किरण भिमराव घाडगे वय २९ वर्षे रा. कुंभारटेक मलटण, फलटण जि.सातारा यांना व सदरचा चोरीचा माल घेणारा आरोपी नंबर (६) राहुल मारुती भोरे रा. मलटण, फलटण अशा एकुण ६ आरोपींना अटक करुन, त्यांचेकडुन चोरलेल्या ६०,०००/- रुपये किमतीच्या युपीएसच्या लिव्हफास्ट कंपनीच्या २३४२ टी टी, २००० ए एच च्या ६ बॅट-या चोरीकरीता वापरलेली मारुती ओमनी कार नंबर एमएच-११/वाय ६३८८, मोबाईल, एक हेक्सा ब्लेड असा एकुण ३,२०,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरचे पोलीसांनी केले उत्कृष्ट तपासाबाबत जनतेतुन व डॉक्टर वर्गाकडुन त्यांचे कौतुक होत आहे.

No comments