बालविवाह व अल्पवयीन मुलीची प्रसूती ; पतीवर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ - अल्पवयीन मुलीचा प्रेमविवाह झाला. विवाहानंतर ती गरोदर राहिली व बाळंतपणासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन तिथे तिची प्रसूती झाली. बालविवाह होऊन अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्याप्रकरणी तिच्या पतीवर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना घडली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे लग्न साखरवाडी येथील, जाधव यांच्या बरोबर तारीख ६ एप्रिल २०२२ रोजी साखरवाडी येथे झाले होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबांच्या सहमतीने अल्पवयीन मुलगी पतीसोबत त्याच्या घरी राहू लागली, त्यांनतर अल्पवयीन मुलीगी गरोदर राहिली. त्यानंतर ती अतीत येथे राहण्यास आली व नंतर दि १३ मार्च २०२३ रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे तिला वार्ड नंबर ९ मध्ये ॲडमिट केले. ॲडमिट करत असताना डॉक्टरांनी तिला वय सांगितले, तेव्हा मुलीच्या आईने वय १८ वर्षे सांगितले, डॉक्टरांनी त्यांना आधार कार्ड मागितले, त्यावरती त्या मुलीची जन्मतारीख १३ सप्टेंबर २००५ अशी होती, त्यावेळी डॉक्टरांनी मुलीस सांगितले तुझे वय १८ पूर्ण झाले नसताना तू लग्न कसे केले. त्यावेळी अल्पवयीन मुलीने त्यांना सांगितले की आमचे दोघाचे लग्न प्रेम विवाहातून झाले आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीची हॉस्पिटलमध्ये दी. १४ मार्च २०२३ रोजी डिलिव्हरी झाली. याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन मुलीच्या पतीवर बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
No comments