Breaking News

श्रीमंत रामराजे यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; जशास तसे उत्तर दिले जाईल - फलटण तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस

File cases against those defaming Shrimant Ramraje - Phaltan Taluka NCP Mahila Congress

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ मार्च - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बद्दल जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांची बदनामी करणाऱ्या व समाजामध्ये अशांतता पसरविणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी फलटण तालुका महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

    आज दि.१ मार्च २०२३ रोजी राष्ट्रवादी फलटण तालुका मिहीला आघाडी यांच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार आणि फलटण पोलीस स्टेशन याठिकाणी निवेदनाद्वारे खालील मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध सांगोला व कुर्डुवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कृत श्रीमंत रामराजे यांच्या बद्दल जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांची बदनामी केली असून, सांगोला येथे त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच कुर्डुवाडी येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले, असे कृत्य करून समाजामध्ये अशांतता पसरविणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा आम्हाला देखील जशास तसे उत्तर द्यावे लागेल व आमच्या या कृत्यामुळे अशांतता पसरल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. समाजामध्ये अशांतता पसरवणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व योग्य ती कार्यवाही व्हावी असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

    यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महीला सौ. रेश्मा राजेंद्र भोसले , सौ. लतिका हरिभाऊ अनपट, सौ. राजश्री शहाजी शिंदे, सौ. भावना माणिकराव सोनवलकर, सौ. नूरजहां दस्तगीर सय्यद, सौ. सपना कोरडे, सौ. प्रतिभा उत्तमराव चौधरी, सौ. रेखा अनिल माने, सौ. स्मिता राजेश खरात, सौ. उर्मिला जयदीप काटे, सौ. स्वाती गजानन नाळे, सौ. लता अनिल यादव, सौ. गितांजली नावरे, सौ. अनिता कर्वे, सौ. पूनम भिसे, सौ. माया पवार, सौ. सुवर्णशीला कांबळे व इतर महीला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

No comments