आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची नाव नोंदणी सुरु
सातारा दि. 2 : शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रक्रयेंतर्गत सर्व पंचायत समिती मध्ये एकूण 217 पात्र शाळा असून एकूण 1 हजार 821 रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांची अर्ज नोंदविण्याच्या प्रक्रियेसाठी 17 मार्च पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी दिली आहे.
ही नोंदणी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेतस्थळावर दि. 17 मार्च 2023 च्या दुपारी 12 वाजेपर्यंत सुविधा उलपब्ध करुन देण्यात आली आहे. पालकांसाठी मदत केंद्राची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांची नोंदणी करावी, असे आवाहनही श्रीमती मुजावर यांनी केले आहे.
No comments