जुनी पेन्शन योजना : सकारात्मक निर्णय होईपर्यंत माघार नाही
अधिकार गृह इमारतीमधील दरबार हॉल मध्ये व्यासपीठावर तलाठी संघटना अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे बोलताना शेजारी अन्य पदाधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना आंदोलनात फलटण तालुक्यातील सर्वच संघटना ठाम असून आज दुसऱ्या दिवशी अधिकार गृह इमारतीमधील दरबार हॉल मध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्याच्या एकत्र येऊन आंदोलनाबाबत आपापल्या संघटनांची भूमिका स्पष्ट करीत कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक निर्णय होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका ठामपणे मांडली.
अधिकार गृह इमारत ही संस्थान कालीन प्रशस्त इमारत असून तेथे बहुतांश शासकीय कार्यालये आणि न्यायालय सुरु आहे. या इमारतीमधील दरबार हॉल या सभागृहात कर्मचाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी व्यासपीठावर तलाठी संघटना अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, फलटण तालुका जुनी पेन्शन समिती अध्यक्ष निलेश जाधव, वाघ सर, योगेश धेंडे, विशाल आढाव, प्रा. शिक्षक सहकारी बँक माजी संचालक अनिल शिंदे व तुकाराम कदम, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना फलटण शाखा सचिव अरविंद नाळे उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यभर सुरु असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देत सर्वश्री दत्तात्रय जानकर, प्रा. नितीन नाळे, प्रा. शिक्षक समिती अध्यक्ष निलेश कर्वे,
प्रा. शिक्षक समिती महिला आघाडी अध्यक्षा सौ. करुणा मोहिते, महसुल विभागाचे गिऱ्हे, प्रा. शिक्षक संघ सरचिटणीस देवदास कारंडे यांनी
जुनी व नवी पेन्शन योजनांमधील फरक, पेन्शनचे महत्व, शासनाची भूमिका, संघटनचे महत्व आणि संघटीत शक्तीचा प्रभाव याबाबत विस्तृत. विवेचन करताना कर्मचाऱ्यांना आंदोलन का व कशासाठी आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती देवून संघटीत ताकदच हा प्रश्न सोडवू शकेल याची ग्वाही दिली.
No comments