खुल्या आणि शालेय गट राज्यस्तरीय जलदगती बुध्दीबळ अजिंक्यपद स्पर्धा संपन्न ; फलटणच्या दिपंकरचे खुल्या गटात वर्चस्व
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर- सांस्कृतिक सभागृह, सातारा येथे, रविवार दि. ०५ मार्च २०२३ रोजी, थ्री टु वन चेस अकॅडमी ,सातारा,यांच्या वतीने "१३ वी- थ्री टु वन चषक"- खुल्या आणि शालेय गट राज्यस्तरीय जलदगती बुध्दीबळ अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये फलटणच्या दिपंकर कांबळे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत खुल्या गटात फलटणच्या दिपंकर कांबळे यांनी ५ पैकी ५ गुण प्राप्त करून अजिंक्यपद मिळवले. इयत्ता ७ वी ते ९ वी शालेय गटाचे अजिंक्यपद गुरुकुल प्रायमरी स्कुल साताराच्या ध्रुव गांधी याने अपराजित राहून ५ पैकी ५ गुण प्राप्त करून अजिंक्यपद मिळवले. इयत्ता ५ वी ते ६ वी गटाचे अजिंक्यपद पोदार इंटरनॅशनल स्कुल साताराच्या रिधिमन कुडची याने ५ पैकी ५ गुण प्राप्त करून मिळवले. इयत्ता ३ री ते ४ थी शालेय गटाचे अजिंक्यपद मोना स्कूल साताराच्या सार्थक जाधव याने ५ पैकी ५ गुण प्राप्त करून मिळवले. आंगणवाडी ते इयत्ता २ री या शालेय गटाचे अजिंक्यपद जेजुरीच्या शिवांश धायगुडे याने ५ पैकी ५ गुण प्राप्त करून मिळवले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सातारा,कराड, वडुज,फलटण, वाई,कोरेगाव, शिरवळ, लोणंद येथुन वयोवर्ष ४ ते ७५ वर्षापर्यंतच्या खेळाडुंसह आणि १८ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसह एकूण ११० स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. थ्री टु वन चेस अकॅडमी ,सातारा तर्फे ही राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे सौ.शकुंतला पवार (एच.आर. मुथा ग्रुप सातारा),सामाजिक कार्यकर्ते श्री.डॉ.रविंद्र भारती (झुटींग), (उपाध्यक्ष ,सातारा जिल्हा बुद्धिबळ संघटना,संस्थापक - अश्वमेध पतसंस्था,माजी सभापती सातारा नगर परिषद), यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय फिडे पंच श्री.प्रणव विजय टंगसाळे यांच्यासह स्पर्धेचे सहाय्यक पंच म्हणून राज्य पंच उद्धव पाटील(जेजुरी),राज्य पंच सौ.गायत्री कुलकर्णी(पुणे),श्री.रुपेश हगिर(वाई) यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी थ्री टु वन चेस अकॅडेमि च्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले,कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार श्री उद्धव पाटील यांनी केले
खुला गट : १) दिपंकर कांबळे (फलटण) ५ गुण - बक्षिस रु.१००० व चषक, २) शुभम कांबळे (फलटण) ४.५ गुण - बक्षिस रु.७०० व चषक, ३) अनिकेत बापट (सातारा) ४ गुण - बक्षिस रु.५०० व चषक, ४) सुमेध पाटील (पुणे),बक्षिस रु.३००, ५) अपुर्व देशमुख (सातारा),बक्षिस रु.३००, ६) नझीर काझी (फलटण),बक्षिस रु.३००, ७) मंगेश चोरगे (वाई),बक्षिस रु.३००, ८) एकता लाहोटी (सातारा),बक्षिस रु.३००, ९) प्रविण सावंत (सातारा),बक्षिस रु.३००, १०) जिया शेख (सातारा),बक्षिस रु.३००,
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडु - तन्वी कुलकर्णी (पुणे) ४ गुण, बक्षिस - चषक, सर्वोत्कृष्ट अनरेटेड खेळाडु - सुरज सोनार (सातारा) ३ गुण,बक्षिस- चषक,
इयत्ता ७ वी ते ९ वी शालेय गट: १) ध्रुव गांधी (गुरुकुल प्रायमरी स्कुल सातारा),५ गुण,बक्षिस- चषक, २) अंकित यादव (जिल्हा परिषद शाळा,कृष्णानगर) ४ गुण , बक्षिस - चषक, ३) अर्जुन अडागळे (जिल्हा परिषद शाळा, कृष्णानगर) ४ गुण,बक्षिस -चषक, ४) अथर्व देशमुख (वडूज), बक्षिस- मेडल, ५) राजवर्धन दगडे (मोना स्कुल सातारा), बक्षिस- मेडल, ६) ओम माने (न्यु इंग्लिश स्कूल सातारा),बक्षिस- मेडल, ७) स्पंदन धायगुडे (अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा),बक्षिस- मेडल, ८) आशिष माने (गुरूकुल प्रायमरी स्कूल सातारा),बक्षिस- मेडल, ९) सत्यम जाधव (मोना स्कूल सातारा),बक्षिस- मेडल, १०) अहंती कदम (जिल्हा परिषद शाळा, मेढा),बक्षिस- मेडल, १) शाल्मली कदम (अण्णासाहेब कल्याणी विद्यालय ,सातारा) ३ गुण, बक्षिस - चषक,
इयत्ता ५ वी ते ६ वी शालेय गट: १) रिधीमन कुडची(पोदार इंटरनॅशनल स्कूल,सातारा) ५ गुण,बक्षिस- चषक,२) सम्राज्ञी पाटील (आप्पासाहेब पाटील रयत इंग्लिश मिडीयम स्कूल,सातारा) ,४ गुण , बक्षिस - चषक,३) अर्णव शेडगे (वडूज), ४ गुण , बक्षिस-चषक, ४) पियुष देवी (पोदार इंटरनॅशनल स्कूल,सातारा), बक्षिस- मेडल, ५) परम पांढरे (वडूज),बक्षिस- मेडल, ६) जान्हवी शिंदे (रयत माध्यमिक विद्यालय सातारा),बक्षिस- मेडल, ७) श्लोक लोखंडे (छत्रपती शिवाजी हायस्कूल ,वाखरी),बक्षिस- मेडल, ८) साईराज ढाणे (अप्पासाहेब भाऊराव पाटील रयत इंग्लिश मिडीयम स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल, ९) अरुंधती चव्हाण (पोदार इंटरनॅशनल स्कूल ,सातारा),बक्षिस- मेडल, १०) स्वस्तिश्री राजपूत (गुरूकुल प्रायमरी स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल,
इयत्ता ५ वी ते ६ वी शालेय गट युवती खेळाडु -१) काव्या दबडे (मोना स्कूल सातारा) ३ गुण, बक्षिस - चषक,
इयत्ता ३ री ते ४ थी शालेय गट:१) सार्थक जाधव (मोना स्कूल,सातारा) ५ गुण,बक्षिस- चषक,२) प्रियांका कुलकर्णी (छत्रपती शाहू अकॅडमी,सातारा) ४.५ गुण,बक्षिस - चषक ३) गुंजन ओसवाल (मोना स्कूल सातारा), ३.५ गुण , बक्षिस-चषक, ४) प्रित चरणकर (मोना स्कूल,सातारा), बक्षिस- मेडल, ५) क्षितिज पाटणकर (जिल्हा परिषद शाळा, वाजेगाव),बक्षिस- मेडल,६) स्वराज शिंदे (पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा),बक्षिस- मेडल, ७) संदेश बंडगर (जिल्हा परिषद शाळा,वरये),बक्षिस- मेडल, ८) शौर्य कणसे (जिल्हा परिषद शाळा,अंगापुर),बक्षिस- मेडल, ९) राघव मोदी (पोदार इंटरनॅशनल स्कूल ,सातारा),बक्षिस- मेडल,१०) आयुष सोळसे (वाई ),बक्षिस- मेडल,
इयत्ता ३ री ते ४ थी शालेय गट- सर्वोत्कृष्ट युवती खेळाडु - १)आयुषी घोरपडे (निर्मला कॉन्व्हेन्ट स्कूल,सातारा) ३.५ गुण, बक्षिस - चषक,
आंगणवाडी वी ते इयत्ता २री शालेय गट: १) शिवांश धायगुडे (जेजुरी), ५ गुण,बक्षिस- चषक, २) रिवा चरणकर (मोना स्कूल,सातारा) ४.५ गुण , बक्षिस - चषक, ३) प्रज्ञेश घोरपडे (निर्मला कॉन्व्हेन्ट स्कूल,सातारा),३.५ गुण , बक्षिस-चषक, ४) विराज पवार (जेजुरी), बक्षिस- मेडल, ५) आरोह गायकवाड (निर्मला कॉन्व्हेन्ट स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल, ६) आरुष कदम (गुरूकुल प्रि - प्रायमरी स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल, ७) राजवीर पवार (निर्मला कॉन्व्हेन्ट स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल, ८) शिवांश वेदपाठक (ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, वडूज ),बक्षिस- मेडल, ९) संस्कृती पवार (जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल, १०) देवव्रत शिंदे (पोदार इंटरनॅशनल स्कूल,सातारा),बक्षिस- मेडल,
आंगणवाडी ते इयत्ता २ री शालेय गट : सर्वोत्कृष्ट युवती खेळाडु - १) भाग्यता साळकर (गुरूकुल प्रायमरी स्कूल,सातारा) ३.५ गुण, बक्षिस - चषक
No comments