रोजगार मेळाव्याचे 15 मार्च रोजी आयोजन
सातारा दि. 10: कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे यांच्यावतीने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक 15 मार्च 2023 रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर ता. कोरेगाव जि.सातारा येथे केले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.
इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भेट द्यावी. काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
No comments