राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धेत फलटणच्या राजवीर कचरे ला २ सुवर्ण १ रजत पदक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - छ.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मैदानावर ४,५ मार्च २०२३ रोजी संपन्न झालेल्या, महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धेत, फलटण जि. सातारा च्या राजवीर धीरज कचरे ने ८ वर्षीय गटात सुवर्ण पदक मिळवत, महाराष्ट्राचा वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल राजवीरचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धेत राजवीर धिरज कचरे याने ८ वर्षे वयोगटात ८० मीटर धावणे १२.३० सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले तसेच ५० मीटर धावणे स्पर्धेत ७.९० सेकंद वेळेत पूर्ण करून रजत पदक पटकावले. त्याचबरोबर ४×५० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धेत राजवीर याने सातारा जिल्ह्याला २ सुवर्ण पदक आणि १ रजत पदक मिळवून देऊन महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या यशाबद्दल राजवीर धिरज कचरेचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), फलटण तालुका ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर आणि क्रीडा मार्गदर्शक राज जाधव सर, तायप्पा शेंडगे सर, धीरज कचरे सर आणि सहकारी ॲथलेटिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
No comments