निंबळक येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - निंबळक ता. फलटण येथे अल्पवयीन मुलीगी झोपलेली असताना, तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी रूपेश शरण्या भोसले याच्या विरोधात भा.दं.वि.सं. व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १/३/२०२३ रोजी रात्रौ ११.३० वाजण्याच्या सुमारास मौजे निंबळक तालुका फलटण येथे रूपेश शरण्या भोसले रा. निंबळक ता. फलटण याने, त्याची नातेवाईक असलेल्या पीडित मुलीस, माझे घरी चल असे म्हणून, सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी हिस घरी नेले. त्यानंतर रात्रौ ९.३० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी, रुपेश भोसले व त्याची पत्नी झोपले. त्यानंतर रात्रौ. ११.३० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी झोपेत असताना, रुपेश भोसले याने, पिडीत मुलीचे तोंड दाबले आणि तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला असल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक डी.सी. गोडसे हे करीत आहेत.
No comments