सोमंथळी येथील वीटभट्टीच्या खोलीतून ८० हजार रुपयांची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सोमंथळी ता. फलटण येथील वीटभट्टीच्या खोलीमध्ये ठेवलेले ८० हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी खासापुरी नंबर एक ता. परांडा येथील आनंद विष्णु शिंदे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१९ मार्च २०२३ रोजी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान,
पाटीलवस्ती, सोमंथळी ता. फलटण येथे, सुहास दत्तात्रय सोडमिसे यांच्या वीटभट्टीच्या खोलीतून, संशयित आनंद विष्णू शिंदे रा. खासापुरी नंबर एक ता. परांडा जि. उस्मानाबाद याने ८० हजार रुपये चोरले असल्याची फिर्याद सुहास दत्तात्रय सोडमिसे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ हे करीत आहेत.
No comments