ढवळेवाडी - निंभोरे ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार व ऑइलची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे ढवळेवाडी, निंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीतील तलाव डी पी नावाच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर मधून चोरट्यांनी २०० लिटर ऑइल सांडून, ५० किलो वजनाची कॉपर तार चोरी करून नेल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.६/३/२०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या पूर्वी, मौजे ढवळेवाडी, निंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीतील तलाव डीपी नावाच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर नंबर ४११३६४३ याची १०० केव्ही ए क्षमता असलेल्या, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर खाली पाडून, ट्रान्सफॉर्मर मधील २ हजार रुपये किमतीचे ४० लिटर ऑइल सांडून नुकसान केले व त्यातील २० हजार रुपये किमतीची ५० किलो वजनाची कॉपर वायर कोणीतरी अज्ञात इसमाने काढून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाही काशीद हे करीत आहेत.
No comments