सोनगावं येथे जनरेटरची चोरी ; दोघांवर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे सोनगाव ता.फलटण गावचे हद्दीत असणाऱ्या सोलर प्लांट येथून, ६० हजार रूपये किंमतीचा जनरेटर चोरून नेल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ फेब्रुवारी २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान मौजे सोनगाव ता.फलटण गावचे हद्दीत असणाऱ्या सोलर प्लांट येथून, ६० हजार रूपये किंमतीचा ७ केव्ही चा किर्लोस्कर कंपनीचा जनरेटर, योगेश दरवडे (पूर्ण नाव माहित नाही) रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे, किरण पवार (पूर्ण नाव माहित नाही) रा. फलटण ता. फलटण यांनी लबडीने चोरून नेला असल्याची फिर्याद दीपक शिवाजी चव्हाण वय 37 वर्षे रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ हे करीत आहेत.
No comments