Breaking News

महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे - ॲड. सौ. मधुबाला भोसले

दीप प्रज्वलन करताना ॲड. सौ. मधुबाला भोसले ,डॉ. रेवती पवार ,डॉ. प्रियांका गायकवाड सौ. प्रियदर्शनी भोसले व इतर 

    Women need to pay attention to health - Adv. Mrs. Madhubala Bhosale

    कोळकी (गंधवार्ता वृत्तसेवा)  - स्वतःचे आरोग्य जर आपण जपले, तरच आपण आपले कुटुंब व्यवस्थित ठेऊ शकतो, म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याकडे  लक्ष देणे  गरजेचे असून महिलांनी अशा मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आजच्या धावपळीच्या युगात महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही महिला स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत या जाणिवेतून सर्व रोग मोफत निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्याला जपणे आपल्या हातात असून आपले आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता निश्चितच हे शिबिर उपयोगी ठरणार आहे या शिबिरासाठी सेवासदन लाईफ लाईन संस्थेचे होत असणारे सहकार्य व कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा ॲड. सौ. मधुबाला भोसले यांनी केले. 

    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूह फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण ,श्रीराम बझार व स्वयंसिद्धा महिला संस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सर्व रोग मोफत निदान व मोफत उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून  ॲड. सौ. भोसले बोलत होत्या. यावेळी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, श्री. सद्गुरु ग्रहतारण संस्थेचे चेअरमन तुषार गांधी, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासकीय संचालिका सौ.प्रियदर्शनी भोसले, सेवासदन लाईफ लाईनचे  डॉक्टर स्वयंसिद्धाच्या संचालिका, उपस्थित होत्या.

    यावेळी डॉ. प्रियांका गायकवाड ,डॉ. रेवती पवार ,डॉ. प्रसाद कवारे यांनी रोग निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

    या शिबिरास डॉ. राहुल वालेकर ,डॉ. दिव्या मॅडम ,डॉ. सिमरन, डॉ. किरण मॅडम ,डॉ. लता बाबर , रवींद्र बाबर त्याचबरोबर सागर भोसले व सर्व सहकारी यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी व उपचार  केले. बहुसंख्य महिलांनी या शिबिराचा याप्रसंगी लाभ घेतला.  ब्रिलियंट अकॅडमी चे कु. रितू कहार व कु. धनश्री तेली यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार  करण्यात आला.

    श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले.ॲड.सौ. मधुबाला भोसले यांनी स्वागत केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.

No comments