Breaking News

भिलकटी येथे डांबून ठेवलेली 4 जनावरे पकडली ; 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

4 animals kept at Bhilkati were caught 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३  - मौजे भिलकटी ता. फलटण गावचे हद्दीत गोठ्यामध्ये २ जर्सी वासरे दाटीवाटीने डांबून ठेवली होती, तसेच छोटा हत्ती या वाहनात एक जर्सी गाय व एक वासरु ठवलेली दिसून आले, या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी फलटण येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, एकूण ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल तंबूत घेतला आहे.

    फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल २०२३ रोजी पहाटे १२.४० वाजण्याच्या सुमारास मोहम्मद शकीब कुरेशी, बिलाल कुरेशी राहणार फलटण यांच्या मालकीच्या भिलकटी येथील गोठ्या मध्ये २ जर्सी जातीचे लहान खोंडे दाटीवाटीने बेकायदेशीर डांबून ठेऊन त्यांना खाण्या पिण्याची कोणताही सोय न करता, गोट्यात डांबून ठेवली होती व शेड मध्ये महिंद्रा कंपनीचा छोटा हत्ती गाडी क्रमांक एमएच ४६ ई  ०६७७ दिसून आली, त्यात पाहणी केली असता त्यामध्ये १ एक पांढर्‍या रंगाची जर्सी गाय १ काळ्या पांढर्‍या रंगाची गाय १ जर्सी जातीचे लहान खोंड दिसून आले, सदर गाडीचा ड्रायव्हर अजित सोपान खोपडे वय ४२ राहणार माहुर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आहे. या प्रकरणात एकूण ३ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments