Breaking News

फलटण ग्रामीण पोलिसांकडून २ संशयित ताब्यात ; आठ गुन्हे उघडकीस

Phaltan rural police detained 2 suspects; Eight crimes were revealed

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  साखरवाडी परिसरात रात्रगस्त करत असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात येऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी आठ गुन्ह्यातील इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेल्या असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील इलेक्ट्रिक मोटारी जप्त केल्या आहेत.

     दिनांक २८ मार्च २०२३ रात्रौ ११ ते दिनांक २९/३/२०२३ रोजीचे ५ वाजेपर्यंत मौजे साखरवाडी तालुका फलटण गावचे हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना साखरवाडी बाजारपेठ चांदणी चौक येथे पोलीस गाडी पाहून दोन इसम शेजारील बोळात लपून बसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी  उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले. त्या नंतर त्यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्यावरती मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे गुन्हा नोंद करून, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी आपले नाव 1)  पृथ्वीराज रवींद्र जाधव वय 20 वर्ष राहणार चौधरवाडी ता. फलटण 2) गणेश संदीप खलाटे वय 19 वर्ष राहणार खुंटे तालुका फलटण अशी असल्याचे सांगून, त्यांनी मौजे खुंटे ता. फलटण मौजे कांबळेश्वर ता. फलटण या गावातून इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपीतांकडून गुन्ह्यातील मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

No comments